
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रचारप्रमुखपदी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार हेमंत टकले, युवक अध्यक्ष मेहबुब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.




