पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी- चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचा ५१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पतसंस्थेच्या मोबाइल अॅपचे अनावरण संस्थेचे मार्गदर्शक शशिकांत झिंजुर्डे आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या सर्व सभासदांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याकामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, याप्रसंगी रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी विभागाचे मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमानिमित्त सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष सनी कदम, उपाध्यक्ष अनिल लखन, सचिव वैभव देवकर, खजिनदार विजया कांबळे, संचालक चारुशीला जोशी, नथा मातेरे, विश्वनाथ लांडगे, भास्कर फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, कृष्णा पारगे, संदीप कापसे, शिवाजी येळवंडे, योगेश रानवडे, विजय मुंडे, विशाल भुजबळ, गणेश गवळी, अभिषेक फुगे, स्वीकृत संचालक युनूस पगडीवाले आदी उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.




