चिंचवड : पोदार इंटरनॅशलन शाळेत विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित केले जाते. क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडू नेहमीच येथे भेट देतात. अलीकडेच ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांनी चिंचवड येथील पोदार शाळेला सदिच्छा भेट दिली.
विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या करिअरच्या प्रवासाची माहिती मिळवली. त्यांनी या वेळी शाळेतील मुलांसोबत खेळण्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. अभिजित कुंटे यांची बहीण मृणालिनी सोबत बुद्धीबळ शिकायला जात असे तिच्याबरोबर सोबत म्हणून अभिजित जायचा खरा तर पण अभिजीतला क्रिकेट व अन्य खेळाची आवड होती पण मृणाली सोबत त्यालाही बुद्धिबळाची विलक्षण गोडी लागली पाहता पाहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत त्यांनी नाव लोकिक मिळवला तो भारतातील चौथा ग्रँड मास्टर आहे.त्यांनी पोदार शाळेत मुलासोबत बुद्धिबळ खेळण्याचा आनंद ही लुटला.
बुद्धीबळ खेळासाठी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे त्यांनी कौतुक केले. तसेच पोदार मधील क्रीडा शिक्षकांच्या मार्फत देखील वेळी वेळी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले जाते.शाळेच्या खेळाच्या दर्जाचे व पायाभूत सोयी सुविधा पाहून त्यांनी विद्यार्थांना खूप प्रभावित केले.आता शालेय स्तरावर बुद्धिबळ खेळाला चालना देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे बुद्धीबळ खेळ स्पेशल प्रमोट केले जाणार आहे. याच्या माध्यमातून बुद्धिबळ हा खेळ तळागाळापर्यंत खेळवला जाणार आहे असे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी सांगितले.या कार्यक्रमावेळी शाळेच्या प्राचार्य सौ शहनाज कोटार ,सौ.ज्योती गाला मॅडम, व पुणे हब चे जनरल मॅनेजर श्री फ्रँकलिन सर उपस्थित होते.




