
पिंपरी :- अॅटो रिक्षामधून आलेल्या महिलेने व तिघांनी एका इसमाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी करून नेला होता. देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी नागेश बाळू भंडारी व निकीता किरण शिंदे (दोघे रा. म्हातोबानगर, वाकड) यांना व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले. चोरी केलेला मोबाईल फोन हस्तगत करून आरोपींना अटक केली. पोलीस कोठडी रिमांड मिळुन कौशल्य पुर्ण तपास केला असता आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने (दि. २०) रोजी पुनावळे येथे इसमाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केल्याचे तसेच त्यांनी थेरगाव, वाकड, सांगवी, पिंपरी परिसरातुन आणखी चार अॅटो रिक्षा तसेच पिंपरी चिंचवड परिसरातुन आणखी १८ मोबाईल फोन चोरी केल्याचे तपासात सांगितले. ते त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आले आहेत.
अद्यापर्यंत त्यांच्याकडुन ५ अॅटोरिक्षा व १९ महागडे मोबाईल फोन असा एकुण ८,८६,०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. देहुरोड, पिपरी व रावेत पोलीस स्टेशनचे प्रत्येकी १ व सांगवी व वाकड पोलीस स्टेशनचे प्रत्येकी २ असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ – २ काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संजय उमाळ, पोलीस अमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, शुभम बावनकर, संतोष महाडीक, कैलास शिंदे, सागर कळमकर, संतोष भराट, सुनिता पटेकर, दिपाली शिंदे यांनी केली आहे.




