
पिंपरी :- संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या वतीने त्याचा निषेध करण्यात आला. आज बुधवारी पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, सावता परिषद प्रदेश अध्यक्ष मयूर राजे वैद्य, महासचिव गणेश दळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, सावता परिषद पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा अण्णा कुदळे, सावता परिषद पुणे संघटक सुरज भुजबळ, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल नाळे, पिंपरी चिंचवड शहर संघटक चैतन्य भुजबळ, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ऋषिकेश ताम्हाणे, संपर्कप्रमुख ऋषिकेश गार्डे, चेतन रासकर, विभाग प्रमुख ससाने, शाम माणिकराव रासवे, सावता परिषद सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष परभणी जगदीश रासवे, तालुका अध्यक्ष सोशल मिडीया ओमकार वैरागर, पंडित मुगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



