पिंपरी, ता. १० : सातारा- कोल्हापूर-सांगली जिल्हा मित्रमंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र युवा हेमंत बर्गे मंच यांच्यावतीने रविवारी (ता. १०) विविध क्षेत्रांतील व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बी. डी. कोटकर (शैक्षणिक क्षेत्र) यांना ‘कोल्हापूरभूषण पुरस्कार’, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे तर ‘सांगलीभूषण’ पुरस्कार हेमंत बर्गे यांना ‘साताराभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी दिली.
हा सोहळा आकुर्डी चौकातील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवनात रविवारी सायंकाळी साडेपाचला होणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते होणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, सहसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा होणार आहे.
तसेच दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सन्माननीय व्यक्तींच्या सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिवाजी ढमाळ, बजरंग गडदे, रजनी शिंदे, राम भोसले, अशोक शहा व सुजाता शहा, ज्ञानेश्वर शिनगारे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.




