
पिंपरी :- माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा अश्विनी चंद्रकांत तापकीर व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत राजाराम तापकीर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक, तापकीरनगर, काळेवाडी येथे हे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.

या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वॉच किंवा एक हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. या शिबीराला रक्तदानदात्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी केले आहे.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशातून व भविष्यात समाजातील विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य गरजू जनतेपर्यंत रक्तपुरवठा केला जावा, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
– चंद्रकांत तापकीर (सामाजिक कार्यकर्ते)…




