पिंपरी (प्रतिनिधी) पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १७) सकाळी ताथवडे येथे घडली.
याप्रकरणी विश्वजीत गोपाल मंडल (वय २८, रा. भूमकर नगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रशांत सर्जेराव कीर्तीकुडाव (वय ३०) महेश सुरेश कीर्तीकुडाव (वय २७ दोघे रा. कडोली, सातारा) यांना अटक केली आहे.
फिर्यादी हे मजुरी काम करतात. ते पायी चालत जात असताना आरोपी अचानकपणे दुचाकीवरून आले व त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत फिर्यादीच्या हातातील मोबाइल हिसकावला. त्यानंतर ते त्यांच्या दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींना जेरबंद केले




