चिखली : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागात “आई आणि मी” हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील पूर्व प्राथमिक विभागात “आई आणि मी” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नर्सरी ,ज्युनिअर के.जी, सिनियर के.जी चे विद्यार्थी व त्यांच्या आई समवेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला.
“लेंकराचें हित I वाहे माउलींचें चित्त II१II
ऐसी कळवळ्याची जाती I करी लाभेंविण प्रीती II२II
पोटीं भार वाहे I त्याचें सर्वस्व ही साहे II३II
तुका म्हणे माझें I तैसे तुम्हां संतां ओझें II४II
कवी यशवंत यांच्या कवितेत आई या शब्दाचे महती पुरेपूर सांगितलेली आहे. मुल आणि आई यांचं नात खूप जवळचं असतं मुलांना काही हवे असेल तर सगळ्यात आधी ते आईकडे जातात.
मुलं, त्यांची आई आणि शिक्षक यांच्यातील जवळीकता वाढवण्यासाठी “आई आणि मी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असे प्रभारी मुख्याधापिका श्रीम. स्नेहल पगार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात संबोधले.
या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. मयुरी मुळूक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे मुलांचे डान्स ,विविध खेळ ,छोट्या बालगोपालांनी अभंग, श्लोक म्हटले. प्रत्येक वर्गातून आई आणि मीच्या उत्कृष्ट जोड्या निवडण्यात आल्या. या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी नृत्य सादर केले. अशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला.




