पिंपरी : महाराष्ट्र राज्यात कै. शिवाजीराव पाटील प्रणित प्राथमिक शिक्षक संघ ही सर्वात जुनी शिक्षकांच्या हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी लढा देणारी संघटना आहे. त्याची पिपरी चिंचवड शहरांमध्ये प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.राज्याचे अध्यक्ष केशवराव जाधव यांनी विलास पाटील यांची अध्यक्षपदी नेमणूक केल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यामध्ये नेतेपदी अरुण दंडवते, कार्याध्यक्ष मुक्तार शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा दहिफळे,सरचिटणीस अक्षय गोरे,कोषाध्यक्ष सविता माने, राज्य संपर्कप्रमुख शंकर पवार, प्रमुख मार्गदर्शक सतीश पाटील, प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर भोसले यांचा कार्यकारणी मध्ये समावेश केला आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघ पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली आहे.
भविष्यात शिक्षकांचे प्रलंबित राहिलेले प्रश्न या मध्ये मुख्याध्यापक, पदवीधर पदोन्नती,धन्वंतरी योजनेची अंमलबजावणी जिल्हा बाहेरून आलेल्या शिक्षकांचे उपदान,नवनियुक्त शिक्षकांचे सेवा विषयक प्रश्न,सेवानिवृत्ती प्रकरणे अनेक वर्षे शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट केलेली नाहीत. त्यासाठी शिबिरे घेऊन ते पूर्ण करणे, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन मध्ये येणाऱ्या अडचणी साठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या माध्यमातून अशैक्षणिक कामे कमी करणे व गुणवत्तेसाठी शिक्षकाला वेळ मिळाला पाहिजे.यासाठी सकारात्मक पद्धतीने प्रशासना बरोबर चर्चा केली जाईल. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेले दहा ते पंधरा वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी कालबद्ध वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासना बरोबर चर्चा करण्यात येणार आहे. शिक्षक निहाय अडचणी प्रलंबित बाबी याची माहिती संकलित केली जाईल.संघटना व ओळखीचे जे लोक असतात त्यांचीच कामे होतात हा समज पुसण्याचे काम प्राथमिक शिक्षक संघ करणार आहे. कार्यकारणीतील इतर सदस्यांची नावे महामंडळ सभा घेऊन जाहीर करण्यात येतील अशी माहिती विलास पाटील अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ पिंपरी चिंचवड शहर यांनी दिली.




