पिंपळे सौदागर (पुणे) :- पिंपळे सौदागर येथील वै. ह.भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सेप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.
हिंदी भाषा दिनाचा मुख्य उद्देश हिंदी भाषेचा विकास करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये प्राथमिक, पूर्व प्राथमिक व माध्यमिक मधील विद्यार्थी नैना नायर इयत्ता ६ वी, रुद्र भिंगारे इयत्ता ६वी, श्रीसाई जायभाय इयत्ता ७ वी, आर्यन मंजुळे इयत्ता ४ थी यांनी सहभागी होऊन विविध हिंदी भाषिक कविता, संवाद, भाषणे सादर केली. तसेच शिक्षकांनी देखील विद्यार्थ्याना हिंदी भाषा दिनाचे महत्व पटवून दिले. यामध्ये वृषाली शेट्टे, अनघा दाबके या हिंदी शिक्षकांचा सहभाग होता.
पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक मा. श्री. जगन्नाथ काटे यांनी हिंदी भाषा रोजच्या व्यवहारामध्ये वापरणे का गरजेचे आहे. यांचे विविध उदाहरणे दिले. त्याच प्रमाणे पी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मा. सौ. धनश्री सोनवणे यांनी “इतनी शक्ति हमें दे ना दाता” ही प्रार्थना सर्व विद्यार्थ्यान कडून म्हणून घेत हिंदी दिनाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांन समवेत सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भक्ती लव्हेकर तसेच सूत्रसंचालन साक्षी शिंदे यांनी केले. तर आभार मंजूषा रेडेकर यांनी मानले.




