पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर गावठाण येथील विश्र्वशांती कॉलनी येथे एमएसईबीच्या लहान डीपीच्या वायर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी फिरणाऱ्या तीन मुक्या जनावरांचा करंट लागून मृत्यू झाला आहे. याला एमएसईबीच्या अक्षम्य कारभारामुळे आज तीन मुक्या जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन परिस्थिती सांभाळली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या देखील जीवाला धोका उत्पन्न होऊ शकला असता त्यामुळे महावितरण विभागाला माहिती कळवत यावरती तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महावितरण विभागाच्या गलथान कारभारावरती नाराजी व्यक्त केली.




