वडगाव मावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधी आमदार रोहित पवार यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा ही घेऊ पाहतायेत; असा गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला.
२० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २२ जून २०२२ या दिवशी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजित दादांकडे गेले होते. मात्र त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच रोहित पवार आम्हाला साहेबांकडे ही घेऊन गेले. असा खुलासा शेळेकेंनी केलाय. त्यामुळं रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये; असा सल्ला शेळकेंनी दिला.
आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहतायेत. पण पवार साहेबांच्या जवळचे दादा हे फक्त अजित दादाचं असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही. असं म्हणत रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेऊ पाहत असल्याचाही गौप्यस्फोट शेळेकेंनी केला.




