पिंपरी (प्रतिनिधी) खेलो इंडिया महिला लीग मध्ये संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्टस या संस्थेतील शरयू संतोष म्हात्रे हिने १२ वर्षाखालील वयोगटात ५० खालील वजन गटात दोन सुवर्णपदक पटकावली. लाइट कॉन्टॅक्ट व पॉइंट फायटिंग या प्रकारात या पदकांवर मोहोर उमटवली शिलारु, हिमाचल प्रदेश येथे पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या बरोबरच खुशी सागर रेवाळे हिने वरिष्ठ गटात ५२ किलो खालील वजन गटात लौकिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले. वैदही उमेश पवार यांनी वरिष्ठ गटात फुल कॉन्टॅक्ट प्रकारात ५० किलो खालील वजन गटात सुवर्णपदक मिळवले. संत तुकाराम नगर येथे आर्यन्स मार्शल आर्टस या संस्थेमध्ये संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. विजयी खेळाडूंचे वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल यांनी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र किक असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




