पिंपरी : दिवाळी सण आणि पूजेचे साहित्य हे समीकरणच आहे. त्यामुळे दिवाळीतील पूजेसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारच्या पूजेच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पिंपरी शगुन चौक ते साई चौक आणि शहरातील व उपनगरातील अन्य ठिकाणी पूजेच्या साहित्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मागील वर्षीच्या येत तुलनेत यंदा पूजेच्या साहित्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळी सणाला सुरूवात झाली आहे. ग्राहकांकडून हळदी- कुंकू, खारीक, खोबरे, सुपारी अगरबत्ती, धुप बाती, तेल, रांगोळी अष्टगंध, विविध प्रकारची फुले, विड्याची पाने, खडी साखर, केळीचे खुंट, तुळशीची पाने दुर्वा आदी प्रकारच्या साहित्याला मागणी आहे.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पूजेच्या साहित्याच्या खरेदीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज विक्रेते व्यक्त करत आहेत. पूजेसाठीचे कापड आर्टिफिशिअल फुले, हार, तोरण हेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्यांची किमत २० रुपयांच्या पुढे आहे. पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी पिंपरी भाजी मंडईमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा पूजेसाठीच्या बॉक्सला जास्त मागणी आहे. इतर साहित्यांची खरेदीही लोक करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकही खरेदीसाठी येत आहेत.




