पिंपरी :- सर्वत्र दिपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दीपावली निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचवेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते थेरगाव भागात शिवशक्ती सोशल फाउडेशन (संचालित) स्पंदन बाल आश्रम येथे दिवाळी निमित्ताने आनाथ मुलांना शालेय साहित्य, नवीन कपडे, बूट, फटाके, मिठाई व अन्य वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी नाना काटे यांचे स्पंदन बाल आश्रमतील मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर नाना काटे यांनी आश्रमातील पाहणी केली व तेथील राहणाऱ्या मुलाविषयी माहिती घेतली. यावेळी बाल आश्रम मधील सर्व मुलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले. यावेळी आश्रमामध्ये ३०-४० मुला- मुलींची उपस्थिती आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, मा. स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, स्पंदन बाल आश्रमचे संस्थापक अध्यक्ष मनोज म्हस्के, मार्गदर्शक भीमराव म्हस्के, साद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पवार, सचिन काळे, सुनिल पाडाळे, अजित निनाले , ज्ञानेश्वर पाटील, शंकर कल्याणी, इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, अजित निनाले , ज्ञानेश्वर पाटील, शंकर कल्याणी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.




