देहू : देहू नगरपंचायतीच्या वतीने मंगळवारी (दि. ५) वैकुंठस्थान ते मुख्य देऊळवाडा दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आली. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देहूतही भाविक दर्शनासाठी येतात. देहूत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अतिक्रमण कारवाई केली आहे.
याबाबत नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक राम खरात यांनी सांगितले, की या कारवाईत २० अतिक्रमणे हटविण्यात आली. कार्तिकी यात्रे निमित्ताने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे व्यापारी नाराज झाले. कार्यालयात राम खरात यांना घेराव घातला. तसेच दुकानांपुढील पार्किंग हटविण्याची मागणी केली.




