पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता डिसेंबर अखेरीस 12 टोळयांवर मोका कायदयातर्गत कारवाईकरत मोकाचे अर्धशतक केले पुर्ण केले. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले होते. मा.पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात नव वर्षे स्वागत शांततेत होण्याकरिता डिसेंबर अखेरीस 12 संघटीत गुन्हेगारी टोळयामधील एकुण 60 आरोपी यांचेवर मोका कायदयातर्गत कारवाई केलेली आहे.सन 2023 मध्ये आजपावेतो 51 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण 357 आरोपींवर मोका कायदयातर्गत कारवाई केलेली आहे.
1) वाकड पो.स्टे गुरनं-998/2023 भादंवि. 395, 323, 506(2), 427, आर्म ॲक्ट 4,(25) म.पो.का. कलम 37 (1)(3) 135 सह, क्रिमी.लॉ.ॲमें. ॲक्ट 3 व 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (टोळी प्रमुख) वय-28 वर्षे, रा. चौधरी पार्क, वाकड पुणे 2) चाकण पो.स्टे.गुरनं- 755/2023 भादंवि. 395, 364 (अ), 387, 120 ब, या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी – शुभम युवराज सरोदे (टोळी प्रमुख) वय 21 वर्षे, रा.नाणेकरवाडी, चाकण ता.खेड जि.पुणे.3) निगडी पो.स्टे.गुरनं-588/2023 भादंवि. 302, 307, 326, 324, 143, 147, 148, 149, 504, आर्म ॲक्ट 4(25), महा. पो.का.कलम. 37(1)(3)135 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबुब कोरबु (टोळी प्रमुख) वय 28 वर्षे, रा. आझाद चौक, उरवेला हौसींग सोसा.बि.नं.5/203, ओटास्कीम, निगडी पुणे व इतर साथीदार 4) पिंपरी पो.स्टे.गुरनं-1112/2023 भादंवि. 307, 323, 506, 34 आर्म ॲक्ट कलम. 4(25), 4(27), महा.पो.का.कलम. 37(1)(3) सह 135, क्रि.लॉ.ॲ. ॲक्ट. कलम. 3 व 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे- प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (टोळी प्रमुख) वय-30 वर्षे, रा. हनुमान जिमचे जवळ,16 नंबर बिल्डींगचे मागे,बौध्द नगर, पिंपरी पुणे 5) पिंपरी पो.स्टे.गुरनं-1113/2023 भादंवि. 386, 387, 504, 506, 212, 34, आर्म ॲक्ट 4(25), महा.पो.का. 37(1)(3) सह 135, क्रि. लॉ. ॲ. ॲक्ट कलम 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी-आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (टोळी प्रमुख) वय 26 वर्षे, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड, पुणे 6) सांगवी पो.स्टे.गुरनं-582/2023 भादंवि 392, 34, 411 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी -आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे, 7) निगडी पो.स्टे.गुरनं-657/2023 भादंवि 392,414, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (टोळी प्रमुख) वय 19 वर्षे, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड पुणे 8) भोसरी पो.स्टे.गुरनं- 902/2023 भादंवि. 387, 385, 504, 506, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी – अक्षय नंदकिशोर गवळी (टोळी प्रमुख) वय 28 वर्षे, रा. 419, गवळी वाडा, खडकी पुणे 9) सांगवी पो.स्टे.गुरनं-547/2023 भादंवि 392, 34, 411 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी-आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे, 10) सांगवी पो.स्टे.गुरनं- 561/2023 भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 506(2), आर्म ॲक्ट 4(25)(27), महा.पो.का.कलम 37(1)(3) सह 135, क्रि.लॉ.ॲमे.ॲक्ट कलम 7 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (टोळी प्रमुख) वय 25 वर्षे, रा. बाबुराव ढोरे भवन समोर, जुनी सांगवी, पुणे 11) चिखली पो.स्टे गुरनं- 740/2023 भादवि. 395, 397, 504, 506, 427 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- मन्नु ऊर्फ अतिष बलदेव कोरी (टोळी प्रमुख वय 21 वर्षे, रा. गोकुळधाम सोसा, घरकुल चिखली, पुणे) 12) सांगवी पो.स्टे.गुरनं-631/2023 भादंवि कलम 392, 411, 34 या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) वय-19 वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे तसेच वरिल सर्व टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर गंंभीर गुन्हे नोंद केल्याची आढळुन आलेली आहे.
वरिल 12 टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारासह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वत:ची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वत:चे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी खून, खूनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी,अप्रमाणिकपणे चोरीची मालमत्ता स्विकारणे, तोडफोड करणे, विनयभंग, अपहरण, खंडणी,दरोडा,दंगा करणे,अश्लिल वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1) (ii), 3 (4) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री.वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा.पोलीस उप-आयुक्त (परि-01) श्री.विवेक पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-02) श्री. काकासाहेब डोळे, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-03) श्री. संदिप डोईफाडे मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, मा.सपोआ श्री. सतिश माने, मा.सपोआ श्री. बाळासाहेब कोपनर मा.सपोआ डॉ.विशाल हिरे,मा.सपोआ डॉ.विवेक मंुगळीकर, मा.सपोआ राजेंद्र गौर, मा.सपोआ विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि गणेश जवादवाड,वपोनि,रणजित सावंत,वपोनि ज्ञारेश्वर काटकर,वपोनि शिवाजी गवारे, वपोनि अशोक कदम,वपोनि रामचंद्र घाडगे, वपोनि राम राजमाने, पोनि संतोष पाटील,पोनि बाळकृष्ण सावंत, पोलीस अंमलदार पोहवा सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी यांनी केली आहे.




