पिंपरी : तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यात मागील महिन्यात आग लागून १४ महिला कामगारांचा मृत्यू झाला. यामधील मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबांना राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र अद्याप पूर्तता झाली नाही. त्यामुळे ती मदत मृत कामगाराच्या कुटुबाला मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष व नगरसेवक पंकज भालेकर यांनी केले केली आहे.

तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यातील घटनेला जवळपास १ महिना होत आला आहे. सदर घटनेची गंभीर दखल घेत राज्य शासनाने दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. सदर दुर्घटनेत मृत्यू आलेले कामगार सर्वच महिला आहेत. या दुर्घटनेमुळे १४ कुटूंबांचे संसार उद्वस्थ झालेला आहे. त्यामुळे नातेवाईकांना शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी. अशी मागणी पंकज भालेकर यांनी केली आहे.




