चिंचवड: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना, मोहननगर शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. मीनलताई विशाल यादव यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळातील सर्वोच्च खेळाडूं माहितीपटाचा , ” गौरव देशाचा क्रीडा विश्वाचा, ” या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, शिवसेना शहर संघटक विशाल यादव, विभाग प्रमुख शशिकांत पाडाळे, नागेश नामदे, सोमनाथ अलंकार, मधुसूदन आंबुसकर, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन धापटे, काशिद काका, रघुनाथ कदम, मा. पीएसआय काळे, मिलिंद दवणे, संजय पारसकर, युवा सेनेचे अनुज महाजन, प्रथमेश पाटील, कुशल बहिरवाडे, स्वप्निल येवले, स्वप्निल वाघिरे यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.




