पिंपरी : आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर पिंपळे सौदागर परिसरात “ELITE TURF BY RDK,S” स्पोर्ट्स अकॅडमीचे उदघाटन मा विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या नवीन व्यवसायासाठी शुभम मिलिंद काटे व ओम् काटे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी युवा नेते ऋषिकेश वाघेरे, बाळूअण्णा काटे, दिलीप आप्पा काटे, राजू काटे, निलेश जगताप व काटे यांचे मित्रपरिवार,पाहुणेमंडळी मोठ्या संख्येने तसेच कुटुंबीय उपस्थित होते.



