पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत १५ वी मासिक सभा पार पडली आहे. यावेळी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाची काय रणनीती असावी यासह शहरातील नागरिकांच्या समस्यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी माझी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, आतूल शितोळे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, सतीश दरेकर आफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यकारीणी, विधानसभा कार्यकारीणी, सर्व सेल कार्यकारीणी, प्रभाग – वार्ड अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते, शहरातील जेष्ठ नेते मंडळी यांची उपस्थिती होती.




