पिंपरी : महानगरपालिकेची पाण्याची टाकी, एल.बी.एस.शेजारी पुनावळे येथे व चिखली गावठाण मधील म.न.पा. शाळा मुले व मुली या ठिकाणी खालील विकास आराखड्यातील रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.
१) मौजे वाकड ,ताथवडे, पुनावळे, रावेत,मामुर्डी व किवळे येथील मंजुर विकास योजनेमधील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस १२ मी. सेवा रस्ता
२) चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२मी/१८मी रुंद डी.पी. रस्ता
३)चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४ मी व ३० मी रुंद रस्ता
४)चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी.पी. रस्ता
५)चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता
६)तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रूंद उर्वरित रस्ता
७) तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता
८) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.०० मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता
दि.०५/०३/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजले पासून ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत जमीन मालक / विकसक जागा ताब्यात देणेसाठी उपस्थित होते व नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याचे संपादनात येत असल्याची खात्री झाले नंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करून जागेचा आगाऊ ताबा दिला व महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे “अ” व “ब” प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले. दोन्ही ठिकाणचे जागेचे मालकांनी उर्वरित क्षेत्र ही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे. या शिबीरामध्ये काही कारणास्तव उपस्थित न राहता आलेमुळे “अ” व “ब” प्रपत्र न मिळाल्यास संबंधित जमिनमालकांनी महानगरपालिकेतील नगररचना व विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यालय इमारत,पिंपरी, पुणे-४११०१८ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधलेस “अ” व “ब” प्रमाणपत्र देणेत येईल.
या दोन शिबिराचे आयोजन मा.आयुक्तः श्री. शेखर सिंह यांचे मार्गदर्शनाखाली केले होते, त्यामध्ये खालील अधिकारी / कर्मचारी यांनी काम पाहिले.
१) उपसंचालक,नगररचना श्री. प्रसाद गायकवाड
२) सहाय्यक संचालक,नगररचना- श्री. संदेश खडतरे
३) कार्यकारी अभियंता- श्री.विजयकुमार काळे
४) उपअभियंता – श्री.उमेश मोने, श्री.सुभाष काळे, श्री.अशोक कुटे, श्री.विजय भोसले,श्री.नरेश जाधव
५) कनिष्ठ अभियंता -श्री.अक्षय कुंभार, श्रीम. वृशाली पाटील, श्री.संजय बंडगर, श्री. राजदीप तायडे, श्रीमती.मीनल दोडल, श्री. अनिल इदे,श्री.अमित पवार,श्री.रुपेश भूराने,श्री.अमोल पाचंगणे, श्री.रुपुकचंद देशमाने, श्री.सच्छितानंद महाजन, श्रीम.रीनल तिडके,श्रीम.अमृता झवेरी, श्री. संदीप वाडीले, श्री.इमरान कलाल, श्री.अमित शिंदे, श्री.दिनेश नेहरकर
६) सर्व्हेअर – श्री.नितीन जवळकर, श्री.मुकुंद क्षीरसागर,श्री.परशुराम बनपट्टे, श्री.घनश्याम गवळी, श्री. कुंडलीक मोहिते, श्री.संतोष कदम, श्री.हनुमंत टिळेकर.




