![]()
लोणावळा : लोणावळ्यातील बंगल्यावर पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. ते पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. दरम्यान, काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यामध्ये 15 पैकी 13 जणांना अटक केली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून एका बंगल्यात हे रॅकेट सुरू होतं. भारतातील विविध राज्यातील काही तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते आणि हे उद्योग करत होते. सरळ-सरळ पॉर्न व्हिडिओ शूट करत होते. महत्वाचं म्हणजे पॉर्न व्हिडिओ बनवणं भारतात गुन्हा आहे. त्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही या लोकांनी हे व्हिडिओ बनवले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरलेला कॅमेरा आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय पोलिसांनी यातील काही व्हिडिओही तप्त केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील एका बंगल्यात विविध राज्यातील काही तरुण जमले होते. हे सर्वजण या बंगल्यात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ बनवत होते. पॉर्न व्हिडिओ बनवणं भारतात गुन्हा आहे. (Porn Film in Lonavala) अश्लील व्हिडिओंवर बंदी आहे. हे माहीत असूनही 15 तरुणांची ही टोळी बंगल्यात पॉर्न व्हिडिओ बनवत होती. यामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच मुलींचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या सर्व आरोपींविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




