भोसरी : अमोल कोल्हे यांच्या चंदेरी दुनियेची माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी खिल्ली उडवली. ‘आम्ही कुठे तरी चंदेरी दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासने द्यायची असा प्रकार होत असल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही. वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटीलांनी व्यक्त केली. मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करत असून शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असे सांगुन मत मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत अशा आढळराव पाटीलांनी कोल्हे यांना खडेबोल सुनावले.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.
अजित पवारांनी ठरवलं तर ते करुनच दाखवतात : आढळराव पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर निशाणा साधत अमोल कोल्हे पाच वर्षात मतदार संघात फिरले नाही, मी या ठिकणी ताकतीने प्रचार करून माझा उमेव्दार निवडून आणेल, असं विधान केलं होतं. या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही उडी घेतली. अजित दादांनी केलेलं विधान योग्यच असून कोल्हे पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाहीत. मात्र, आता निवडणूक आल्यावर आक्रोश यात्रा सुचतेय. पाच वर्षात जनता आक्रोश करत असताना यांना दिसले नाही. राहिला विषय अजित दादांचा, दादांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती ते करून दाखवतात हे आपणा सर्वांना माहितीय. मी कोणत्या गटाकडून निवडणूक लढणार अद्याप हे ठरायचं असून मी सुद्धा या जागेवर इच्छुक असल्याचा दावा आढळराव यांनी केला.




