
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनांचे पालन करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याचे झोकून काम करणार असा निर्धार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाची नियोजित बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे,गणेश अप्पा ढोरे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,बाबुराव वायकर,विठ्ठल शिंदे,सुभाषराव जाधव,जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले,गणेश काकडे,संतोष भेगडे,साहेबराव कारके,किशोर सातकर,शिवाजी असवले,मंजुश्री वाघ,दीपाली गराडे, कल्याणी काजळे तसेच मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




