पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा झाला. यावेळी मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. आपण पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले गेल्या अनेक वर्षापासून संबंध आहेत. पण, संबंधाचा गैरअर्थ सुरू आहे. माझी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निवडणुका होईपर्यंत कोणीही भेटायला जाऊ नका अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनीताई जगताप, सुनील आण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, प्रचारा दरम्यान विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म आपण पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.



