मावळ : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम राज्यात आरोप प्रत्यारोप मध्ये सुरू आहे. अशातच मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बद्दल धक्कादायक गोप्यस्फोट केला आहे.
22 जुन 2022 रोजी वाय बी सेंटरला शरद पवार साहेबाकडे कोण घेऊन चालले होते. आमच्या सर्व आमदारांचा म्होरक्या कोण होतं की जे सांगत होते की भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे. आपण सत्तेत जायला पाहिजे तेच रोहित पवार आज निष्ठेची भाषा बोलतात. आपण पहिला टर्मचे आमदार आहात थोरात यांचा आदर केला पाहिजे. आपल्या भावना जरूर मांडला पाहिजे. परंतु आपण देखील किती पाण्यात आहात हे जनतेला माहित आहे. अधिक खोलात न जाता योग्य वेळ आपल्या तोंड बंद करावा अन्यथा आम्ही या आठवड्यात तोंड उघडणार आहोत असा सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना इशारा दिला आहे.



