पिंपळे सौदागर : मुंबई येथील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला. ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळेच घडली आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक परवाना धारक व अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी माहिती संकलित करण्याचे काम करतो असे सांगितले. पण वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने आज गुरुवार दिनांक १६ मे रोजी मोशी येथे एक होर्डींग दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने अनधिकृत होर्डिंग वरती कारवाई करावी, स्ट्रक्चर ऑडीट करावे अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांना केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरातीसाठी अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनधिकृत होर्डिंग ची संख्या अधिक आहे. काही होर्डिंग कायमस्वरूपी तर काही तात्पुरते उभी करण्यात आली आहेत. असे होर्डिंग सुरक्षेच्या दृष्टीने उभारणी केलेली नाही. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत.
दोन दिवसापूर्वी मुंबईतील दुर्घटनेत अनेक नागरिकांना आपले प्राण गमववे लागले आहे. अशाच दुर्घटना पिंपरी चिंचवड शहरात मागील काही वर्षांमध्ये पुनावळे, मोशी, हिंजवडी या परिसरातील घडल्या आहेत. परंतु दुर्दैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही. शहरातील प्रत्येक चौकात, प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यावरती शेकडो अनधिकृत होर्डिंग बॅनरबाजीमुळे नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे उभारण्यात आले आहेत.
शहरात पावसाळ्याच्या दिवसात वादळ व मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोणत्याही होर्डिंगमुळे दुर्घटना घडू नये त्यासाठी खबरदारी म्हणून आणि मानवी जीवाचे सुरक्षा करिता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील सर्व लहान मोठ्या होर्डिंगचे सुरक्षेचा द्रुष्टीने स्ट्रक्चर ऑडीट तातडीने करण्यात यावे. तसेच अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्य दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




