पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पावसामुळे हिवताप, डेंग्यु व चिकुनगुन्या या किटकजन्य रोगांच्या साथी उदभवु नयेत म्हणुन काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
घ्यावयाच्या काळजीबाबत…
हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यु, चिकुनगुन्या हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभुत असतात. हिवताप, डेंग्यु किंवा चिकुनगुन्या झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप/ डेंग्यु/ चिकुनगुन्याचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात असा विषाणुजन्य डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्याला हिवताप/ डेंग्यु/ चिकुनगुन्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवताप /डेंग्यु /चिकुनगुन्या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे.
• डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंडयातुन बाहेर पडणा-या डासांच्या अळया त्याच पाण्यात वाढतात. ४-५ दिवसानंतर या अळयांचे कोष बनतात व हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातुन २ दिवसांनी डास बाहेर पडतात.
• डासांच्या अंडयापासुन त्याचा डास होण्यास ०८-१० दिवसांचा कालावधी लागतो म्हणुन जर आपण दर आठवडयास साठलेले पाणी एकदा पुर्णपणे वापरुन ड्रम कोरडा केला, सुकवुन नंतर परत भरला तर त्या पाण्यात असलेल्या अंडी/अळया मारल्या जातील व डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल.
• आपल्या घरातील पाण्याचे काही साठे असे पुर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. उदा. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरात असलेली पाण्याची टाकी अशा ठिकाणी डासांनी अंडीच घालु नयेत म्हणुन या टाक्या पुर्णपणे झाकण टाकुन बंद ठेवाव्यात म्हणजे डास टाकीत शिरु शकणार नाहीत.
• आपल्या घरामध्ये फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी पाणी साठलेले असते. दर आठवडयास या वस्तुतील पाणी बदलले गेले नाही तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते.
डेंग्यु/ चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार वाढु नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण महत्वाचे असुन यासाठी फक्त एवढेच करावयाचे आहे.
• घरात पाणी साठविण्याची सर्व भांडयातील पाणी वापरुन रिकामी करुन घासुन/ पुसुन कोरडी करावयाची आहेत व त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावयाचे आहे.
• घरातील मोठया टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे.
• घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रे मधील पाणी दर आठवडयास रिकामे करावयाचे आहे.
• घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे.
• घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणे पाणी वाहते केले जाईल याबाबत दक्षता घेणे.
• शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंन्ट पाईप ला जाळया बसविणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत घ्यावयाची काळजी व उपाययोजनाकामी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली किटकजन्य आजार नियंत्रण करीता मासक्युटो अबेटमेंट समिती स्थापना करण्यात आलेली आहे.
• शहरातील बांधकाम व्यावसायीक, गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व औद्योगिक अस्थापना यांना किटकजन्य आजाराबाबत करावयाच्या उपाययोजना विषयी माहितीपत्र देण्यात आलेले आहे.
• सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीक तसेच सर्व पिं.चिं.म.न.पा.रुग्णालय यांना त्यांच्या रुग्णालयात आढळून आलेल्या डेंग्यु NS1 दुषीत आढळून आलेल्या रुग्णाचा रक्तजलनमुना निश्चित निदानासाठी वाय. सी. एम. रुग्णालय येथे कार्यान्वीत असलेले सेंटीनल सेंटर येथे पाठविणेकामी कळविण्यात आलेले आहे.
• पिं.चिं.मनपा परीसरातील मनपाचे दवाखाना, रुग्णालय, व खाजगी रुग्णालयांमध्ये आढळुन येणाऱ्या डेंग्यु/ हिवताप /चिकुणगुणिया सदृश /दुषित रुणांचे वास्तवाचे परिरसरात डासोत्पत्ती प्रतिबधांत्मक कार्यवाही करीता औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण व कंटेनर सर्वेक्षण करीता मनपाचे आरोग्य विभाग, क्षेत्रिय कार्यालय मधील संबंधित आरोग्य निरिक्षक (किटकनाशक) /मलेरीया निरीक्षक यांना वैद्यकीय विभागामार्फत कळविण्यात येत आहे.
• वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या ८ रुग्णालय व ३४ दवाखान्यांमार्फत प्रत्येक आठवड्याला पिंपरी चिंचवड शहरामधील विविध ठिकाणी लहान बालकांचे लसीकरण सत्र घेण्यात येतात. अशा सत्रामध्ये किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखणेकरिता जनजागरण करण्यात येते तसेच सदर सत्रांमध्ये एम.पी.डब्ल्यू. व ए.एन.एम. कर्मचा-यांमार्फत नागरिकांना परिसर स्वच्छता, घरांमधील साफसफाई, रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी इ. बाबींसंदर्भात शिक्षण देण्यात येत आहे.
• पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये किटकजन्य आजाराबाबत जनजागृतीकामी माहितीपत्रके (डेंगीबाबतची माहिती व त्याकरिता घ्यावयाची दक्षता) रुग्णालयीन कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचा-यांमार्फत घरोघरी वाटप करुन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये ओ.पी.डी. चे ठिकाणी नागरिकांनाही सदरची पत्रके वाटप करण्यात येत आहे.
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांत व दवाखान्यांमध्ये डेंगीचे तपासणीकरिता आवश्यक असलेले Rapid Kit उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
• किटकजन्य रोग नियंञणकामी डासोत्पत्ती स्थाने नष्ठ करणेबाबत अळी प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरीकांचे घराचे कंटेनर सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करणेबाबत आरोग्य मुख्य कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
• भंगार मालाची व टायर, पंक्चर दुकाने तपासणी मोहिम वैद्यकीय विभाग व आरोग्य विभाग यांनी संयुक्तीक पदध्दतीने राबविलेली आहे.
डेंग्यु, चिकुनगुन्या व हिवताप रुग्णांची लक्षणे खालीलप्रमाणे असून लक्षणे आढळून येताच नजीकच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातून औषधोपचार व सल्ला घ्यावा.
डेंग्यु तापाच्या रुग्णांची लक्षणे चिकुनगुन्या तापाच्या रुग्णांची लक्षणे हिवताप रुग्णांची लक्षणे
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी कमी मुदतीचा तीव्र ताप थंडी वाजुन ताप येणे
उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे. डोकेदुखी, अंगदुखी ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो
अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे तीव्र सांधेदुखी नंतर घाम येऊन अंग गार पडते.
त्वचेखाली, नाकातुन रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे. अंगावर पुरळ आढळुन येणे डोके दुखते बऱ्याच वेळा उलट्या होतात
काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते. वरील सर्व लक्षणे ७ ते १० दिवसांसाठी असतात वरील सर्व लक्षणे ७ ते १० दिवसांसाठी असतात
• हिवतापाचा निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते.
• डेंग्यु व चिकणगुन्या आजाराचा रुग्ण निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचाच पॉझिटीव्ह अहवाल आवश्यक आहे. कोणत्याही रॅपीड किट अहवाल निश्चित निदानासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही.
येणा-या पावसाळयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरु नयेत म्हणुन वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी डासोत्पत्ती स्थानांवरील नियंत्रणाची उपरोक्त माहिती नागरिकापर्यंत पोहोचवुन सामाजिक प्रबोधन व जनजागरण करण्यासाठी आपले बहुमोल सहकार्य मिळावे, हि विनंती.
(डॉ. लक्ष्मण गोफणे)
आरोग्य वैदयकीय अधिकारी
पिंपरी चिंचवड महानगरपलिका




