पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकूण 135 छोटे आणि 57 मोठे नाले आहेत. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांशी जोडणाऱ्या नाल्यांची स्थिती चिंताजनक आहे. नुकत्याच झलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी गटारी तुंबल्याचे दिसून आले. त्यामुळे मान्सूनपूर्व नाले सफाईचे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाने आपल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमधून माहिती संकलित करावी. शहरातील महत्त्वाचे नद्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांशी जोडणाऱ्या नाल्यांची साफसफाई तातडीने करावी. यामध्ये घाण, प्लास्टिक, भंगार आणि इतर कचरा सामग्रीच्या अंदाधुंद विल्हेवाट लावत आहेत. घरातील कचराही वारंवार या उघड्या नाल्यांमध्ये टाकला जातो. काही प्रमाणात गाळ साचल्याने नाले अरुंद आणि उथळ झाले आहेत. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात, प्रभावीपणे पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. परिणामी, साचलेले पावसाचे पाणी बहुतेकदा परिसरातील निवासी आणि व्यावसायिक परिसरांना साचते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रोगराई वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.
‘नेहमीची येतो पावसाळा’ मानसिक ते मधून बाहेर पडत स्वच्छता करा..,.
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू असते. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून प्रशासन हे काम करण्यात असते. त्यामुळे वरवर साफसफाई झाल्याचे चित्र प्रत्येक पावसाळ्यात स्पष्ट होते. यंदाही सफाईला सुरुवात झाली असली तरी, अपुरे मनुष्यबळ आणि उदासीन मानसिकता याचा प्रत्यय या कामातून दिसून येत आहे. त्यामुळे नदीला जोडणारे नाले स्वच्छ न झाल्यास पावसाळ्यात पुराचा धोका होवू नये, यासाठी आरोग्य विभागाने शहरातील सर्व नाल्यांची वार्षिक स्वच्छता मोहीम 31 मे पूर्वीच पूर्ण करण्यासाठी तातडीने काम हाती घेत पूर्ण करावी. शहराच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शहर व उपनगरातील सर्व लहान मोठे नाले सफाईची कामे पूर्ण करावीत असे नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




