पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात आयटी कंपन्यांनी अनेक भाग व्यापून घेतला आहे. जागतिक महामारी कोविड काळात अनेक कंपनीचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करताना दिसत होते. काही कंपन्यांच्या कर्मचारी आजही तसेच काम करत आहेत तर काही कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर कंपन्याने आपले ऑफिस इतरत्र हलवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आयटीतील काही कंपन्या या कारणामुळे स्थलांतरित झालेल्या आहेत. तर अनेक कंपनी या परिसरात आलेल्या आहेत हे वास्तव आहे.
उलट कोणत्या कारणामुळे कंपन्या बाहेर पडल्या याची माहिती व आकडेवारी न सांगता उद्योजक आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने सरकारकडून परिसरात दळणवळण सुधारावे आणि जलद गतीने विकास व्हावा व सुख सुविधा मिळाव्यात यासाठी वारंवार लेटर बॉम्ब टाकला आहे. तसेच आयटी पार्कमधील इतर कंपन्या स्थलांतरित होतील अशी भीती निर्माण करत आयटी इंजिनियर्स मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पुणे शहरातील पिंपरी चिंचवड तळवडे आणि हिंजवडीचा भाग आयटी क्षेत्रामुळे सर्वात जास्त चर्चेत आला. या ठिकाणी मेट्रो, नवनवीन रस्त्याची निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास होत आहे आणि अजूनही काही रस्त्याची निर्मिती झालेला नाही. हिंजवडी परिसरात फेज वन, टू, थ्री मध्ये अनेक कंपन्या कोविड महामारी नंतर पुन्हा हळूहळू स्थिर होताना दिसत आहेत. या भागात वाहतूक कोंडीची समस्या प्रमुख आहे ती अद्याप सुटू शकलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, pwd, PMRD आणि हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या एकत्रित न होणाऱ्या बैठकामुळे आणि समन्वय यांच्या अभावामुळे या परिसरातील रस्ते विकसित होताना दिरंगाई होत आहे. याचा परिणाम सध्या हिंजवडीतील आयटी कंपन्याना अडचणींना सामोरे जात आहेत. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास काही कंपन्या स्थलांतरित होतील ही त्याचा मोठा फटका पुण्याला बसेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बार्कले, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स, वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर अशा कंपन्या दुसऱ्या भागात गेल्या आहेत. याचा मोठा परिणाम तरुणांच्या रोजगारावर आणि इतर येणाऱ्या कंपनीवर पडणार आहे. तसेच आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याची शास्वती राहिलेली नाही. यावर्षी नोकरीसाठी नोंदणी करणाऱ्या ३५.८ टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही. मागच्या वर्षी आयआयटी मुंबईच्या ३२ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नव्हती. मागच्या दोन वर्षांत प्लेसमेंटच्या बाबतीत हजारो विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. नोंदणी केलेल्या २००० विद्यार्थ्यांपैकी ७१२ विद्यार्थ्यांना अद्याप रोजगार मिळालेला नाही हेही वास्तव समोर आले आहे.
2023-24 चं भीषण वास्तव
देशातील 23 आयआयटीत 38 टक्के विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच नाही.
दिल्ली आयआयटीत यंदा 400 विद्यार्थ्याना नोकरी नाही.
23 आयआयटीमधून 7000 विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी.
2 वर्षापूर्वी 3400 विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती नोकरी



