इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हिंदुत्वाचे ठेकेदार असलेले राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ छावा मराठा महासंघाच्या वतीने आळंदी येथील नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्राला देशभरामध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. याच तीर्थक्षेत्रातून वाहणारी इंद्रायणी नदी ज्या नदीला तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास आणि वारसा आहे. या तीर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी वारीला देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात या नदीत स्नान करून याच नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्रशासन करतात.ज्या नदीला मातेसमान पवित्र गंगेचे स्थान आहे.परंतु ही इंद्रायणी नदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गृहनिर्माण संस्थेतील मैला मिश्रित पाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामधून सोडले जाणारे केमिकल युक्त पाणी कोणत्याही प्रक्रिये विना नदीत सोडले जात आहे.त्यामुळे भाविकासह सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर पाणी शुद्धीकरणाचे ETP,STP संच असून पण बंद अवस्थेत आहेत ज्यामुळे या पवित्र नदी पात्रात हे घाण पाणी सोडून याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हे नदी प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिका नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून करोडो रुपये दरवर्षी खर्च करीत असते तरीसुद्धा ही नदी स्वच्छ होऊन शकली नाही. याला महापालिका,प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्ट अधिकारी आणि येथील भ्रष्ट आणि नालायक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत जे विकासाचा पैसा रिंग करून पळवतात.ज्याला राज्यातील सरकार पाठीशी घालत आहे. जणू हे सरकार या भ्रष्टाचारातील भागीदारच आहे.त्यामुळे देशाचे शृद्धस्थान असलेल्या,आपली भाविक वारकऱ्यांची अस्मिता असणाऱ्या तिर्थ क्षेत्राला काळीमा फासणारी, जलचर, मनुष्य प्राण्यासह मुक्या जनावरांच्या जिवाशी खेळणारी,ही स्मार्ट सिटी कशी असू शकते ? स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेला लुटण्याचा हा नवीन मार्ग सरकारने शोधलाय.असा सवाल संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी केला.
हे इंद्रायणी नदीचे प्रदूषण त्वरित नाही थांबल्यास संबंधित अधिकाऱ्यांना याच इंद्रायणी नदीच्या पाण्याने अंघोळ घालून भविका प्रमाणे तीर्थ म्हणून त्यांना पाजू असा इशारा या जलसमाधी आंदोलना वेळी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय जाधव,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील,व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंगद जाधव,संपर्क प्रमुख गणेश सरकटे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रवीण कदम,छावा युवती अध्यक्ष किरण नाईकडे,जिल्हाध्यक्षा हेमलता लांडे पाटील,निलम सांडभोर, शहराध्यक्ष निशा काळे,विष्णू बिरादार,इस्माईल शेख, सतीश गरड,गोविंद पवार,वसंत तेलगावे, मोईन शेख,संतोष भामरे,अमित मोरे,सचिन सूर्यवंशी,अहमद शेख,शादाब पटेल, संजय केकान यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.




