पुणे : पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषवलेले योगेश यांची पीएमआरडीच्या आयुक्तपदी निवड करण्यात आले आहे. अप्पर आयुक्त नितीन गंद्रे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारीपदी योगेश म्हसे यांची २३ जानेवारी २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. म्हसे यांनी यापूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास (म्हाडा)च्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.च्या महाव्यवस्थापक तसेच भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची आजवर ख्याती राहिलेली आहे.




