
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याचे हे यश असून मनुष्यबळासंदर्भात मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत मोदी सरकारने नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता.
मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री शपथ घेतल्यानंतर लगेचच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.




