भोसरी : पुणे नाशिक मुख्य रस्त्यांवर भोसरी येथील उत्तम पुलाचे खांब विविध रंगांनी सजवलेले आहेत. परंतु याच खांबावरती अनाधिकृतपणे पोस्टर बाजी केल्याचे आढळून येत आहे. यामुळे लोकांच्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केलेला पाण्यात गेला आहे.
परिसरातचौका चौकात विद्युत खांबावर, महावितरणच्या डीपीवर तसेच सार्वजनिक व खासगी जागांवर अनधिकृत बॅनर पोस्टर्स होर्डीग्ज, फ्लेक्स, बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जात आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा अंमलात आणला तरीही या कायद्यात अंतर्गत मालमत्ता विद्रूप करणाऱ्यांना दंड व कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
परंतु महापालिका प्रशासनाकडून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे कुठेही अनधिकृत बॅनर पोस्टर्स होडींग्ज, फ्लेक्स, बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून शासकीय मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जात आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा अंमलात आणला पाहिजे. जाहिरात करण्याची दिवसेंदिवसे संख्या वाढत चालली आहे. अनधिकृत बॅनर्स पोस्टर होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे.कायद्यानुसार तीन महिने कारावासाची शिक्षा किंवा दोन हजार रुपये दंड अथवा एकाचवेळी दंड व शिक्षा तरतूद अंमलात आणावी अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.




