तळेगाव : बेफाम स्कार्पीओ गाडीने रस्त्यावरील दोन वाहनांना धडक देऊन अपघातस्थळावरुन पळून गेलेले तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे अखेर निलंबित करण्यात आले. सदर आदेश सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने केले असल्याची माहिती अनिरुध्द जेवळीकर (उप सचिव, महाराष्ट्र शासन) यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
काय आहे हे प्रकरण……
मुख्याधिकारी एन के पाटील यांच्याविरोधात अपघातप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनिवारी (ता.०१ जून) रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर, काका हालवाई दुकानाच्या जवळ तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील लाल रंगाऱ्या स्कार्पीओ गाडी क्र.एम.एच.१३ ई.सी.९६३३ ही मानवी जिवीतास धोका होईल अशा स्थितीत निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या कडेला उभी असलेली पोलो वोल्सवॅगन, गाडी क्र.एम.एच.१४ सी.एक्स ३६६० गाडीला पाठीमागून धडक देऊन नुकसान केले. समोर उभ्या असलेल्या दुस-या एका ब्रिझा गाडी क्र. एम.एच.१४ जी.एस.२४०४चे देखील नुकसान केले होते.
याप्रकरणी नुकसानग्रस्त गाडीमालक सिध्दाराम इरप्पा लोणीकर (३७,४०१, शिवसाई रेसिडेन्सी, क्रांतीविर कॉलनी, नडेनगर, काळेवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीवरून मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 279, 336, 427, ठाण्यात भा.द.वि.कलम 279, 336, 427, सह मो.वा.का. कलम 184,185, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात करणा-या गाडीचे चालक नामे एन. के. पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीकरीता त्यांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी तिन्ही अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात आणून जमा केली.
मुख्याधिकारी मद्यधुंद असल्याची फिर्यादीची माहीती अपघात झाल्यानंतर फिर्यादी यांनी मुख्याधिकारी एन के पाटील यांना थांबवून विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते व त्यांनी मद्य प्राशन केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. दारु पिऊन गाडी का चालविता? असे फिर्यादीने विचारले असता मुख्याधिकारी एन के पाटील त्यांच्या ताब्यातील गाडी घेऊन अपघात स्थळावरुन पळून गेले. या अपघाताबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादींनी तक्रार दिल्यानंतर पोलीस हवालदार त्यांच्या वतननगरमधील लोमटे रेसिडेन्सी या निवासस्थानी पाटील यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता वारंवार दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




