लोणावळा : लोणावळ्यातील टायगर पॉईंट याठिकाणी प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 व सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम 2003 वे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (दि. 06) रोजी आतवण गावचे हद्दीत असलेल्या टायगर पॉईट येथे मंगेश स्नॅक्स सेटर या दुकानामध्ये मंगेश नंदु कराळे (वय 25 वर्षे रा. खंडाळा ता. मावळ जि. पुणे) व राकेश गणपत वारे (वय 25 वर्षे रा. खोपोली. ता. खालापुर जि. रायगड) हे सार्वजनिकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होणारे व शासनाने बंदी घातलेला हुक्का विकत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
त्याअनुषंगाने पो. नि. किशोर धुमाळ, पो. हवा. जय पवार आणि पो. शिपाई सिद्धेश शिंदे यांनी छापा टाकून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी वनरक्षक वेदीका रामराव शिर्षे (वय 32, रा. वडगांव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तीक व पो.नि. किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले हे करीत आहे.




