पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस झाला असून लवासा याठिकाणी 453 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.या विक्रमी पावसाचा फटका लवासा या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.तसेच या घटनेमुळे 2-4 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची खबर जिल्हा प्रशासनाला दिली आहे असे समजते.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबईत देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.
पुण्यात मागच्या २४ तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडली आहे. त्यातच आज झालेल्या विक्रमी पावसाने लवासा परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच काही बंगलेही कोसळल्याची माहिती समोर येत आहे. लवासा ते वरसगाव रस्त्याला भेगा पडल्या आहेत. काही माणसे बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे.




