पिंपरी : स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे. पावसाने महानगरपालिकेच्या प्रशासनाची पोलखोल केली असल्याचं बोललं जात आहे. शहरात २,३०० पेक्षा अधिक खड्डे असल्याची कबुली स्वतः शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे. पावसाचे कारण देत तात्पुरते खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनोखं आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यात कमळाच्या फुलांचं रोपण करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला
चिखली- मोशी- चऱ्होली रेसिडेन्शिअल कॅरिडोर केल्याच्या बाता मारणाऱ्या भोसरीच्या आमदारांनी चऱ्होली, मोशी ते चिखली या रस्त्यांवर प्रवास करून रस्त्यावरील खड्डे पहावे. येथे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा मनस्ताप यांचा अनुभव घ्यावा म्हणजे आपण नक्की गेल्या दहा वर्षात काय केले याची उपरती होईल अशी जळजळीत टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.
यावेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, नंदू शिंदे, सुनील गव्हाणे , मल्हारी गवळी, जयेश गव्हाणे, किशोर गव्हाणे, विनोद गव्हाणे, सागर गव्हाणे, विनायक रणसुभे, विनोद गव्हाणे, संतोष डफळ, चऱ्होलीचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, दत्ता बुर्डे, प्रशांत तापकीर, सचीन तापकीर, वैशाली तापकीर, प्रतिभा तापकीर, सुरेखा तापकीर, अनिल तापकीर, संतोष वांदळे तापकीर, राजू बुरुळे, सागर तापकीर, अनिल तापकीर , संतोष तापकीर, सागर तापकीर, कुणाल तापकीर, सुरज दाभाडे, शैलेश चंद्रकांत तापकीर, प्रवीण तापकीर, मुकुंद शेळके, दिनेश तापकीर, आदी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय, ऐकतोय कोट्यावधी रुपये खर्चाचे आकडे दाखवले जातात. पण ठोस कामे दिसतच नाही. पैसे तर खर्च झालेत मग या भागाचा विकास अजूनही का रखडला आहे. चऱ्होली आज शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लाखो लोक इथे वास्तव्याला आहेत. शहरातून बाहेर ये जा करण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग असताना येथील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावते त्याचा परिणाम पुणे नाशिक महामार्गावर होत असल्याचे देखील दिसून आले आहे. याच गोष्टीचे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.
अजित गव्हाणे
माजी अध्यक्ष, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका




