वाकड परिसरातील म्हतोबा नगर दत्त मंदिर रोड वाकड येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान विजेचा खांब डोक्यावर पडून हातगाडी चालक भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. नागरिकास हातगाडी चालकाला पुढील उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. विजेचे खांब काढणाऱ्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना झाली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.