पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे निष्ठावान व पक्षाची सुरुवात करणारे स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचे वारसदार रवी लांडगे यांनी शिवसेना उभाठा गटात प्रवेशाची शक्यता निर्माण झाली आहे. आज रवि लांडगे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सोबत बंद दराआड चर्चा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे.
भोसरीतून भाजपा आमदार महेश लांडगे यांना रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून विधानसभेचे तिकीट निश्चित केले असे बोलले जात असतानाच, आज माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून ‘नवा राजकीय डाव’ टाकला आहे.
भोसरी विधानसभेत लढलेल्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली असतानाच अचानक अंकुशराव लांडगे यांचे वारसदार रवी लांडगे यांनी भोसरी विधानसभेत शिवसेना युद्ध बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्याने शिवसेना भोसरी विधानसभेचा दावा कायम ठेवणार आहे. अशा चर्चा पिंपरी चिंचवड शहर राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता भोसरीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे सामना होणार की लांडगे विरुद्ध गव्हाणे सामना होणार हे पाहावे लागणार आहे.