खेड : न्यायालयात सुरू असलेल्या वादाच्या कारणावरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले आहेत ही घटना गुरुवारी (दि.22) सायंकाळी करंजविहीरे खेड येथे घडली. याप्रकरणी संभाजी बबन कोळेकर ( वय 46 रा .करंजवहीरे खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पती आतिश अंकुश मरगज (वय 30 रा. खेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी निकिता मरगज (वय 26) ही आई-वडिलांकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होती. यावेळी आरोपी हा तिथे आला व त्याने पत्नीशी सुरू असलेल्या न्यायालयातील वादाच्या कारणावरून चिडून पत्नीच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यावरून एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.




