
ejanashakti : मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमात हजारो भगिनींनी आमदार सुनील शेळके यांना राखी बांधून यापुढेही सदैव साथ देण्याचे वचन दिले.

“आमदार सुनील आण्णा शेळके यांनी नेहमीच भावासारखे पाठबळ संघटनेला दिले आहे. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याला आण्णा नेहमीच सन्मानाची वागणूक देत असतात. त्यामुळे आम्ही भगिनी म्हणून सदैव त्यांच्यासोबत उभ्या राहू,” या शब्दात मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दीपाली गराडे यांनी भावना व्यक्त केल्या.
अत्यंत हृद्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे, कल्याणी काजळे, तेजस्विनी गरुड, सुवर्णा घोलप, वर्षा नवघणे, वनिता मुऱ्हे, ज्योती आडकर, उमा शेळके, छाया ठाकर, वैशाली आहेर, सुवर्णा राऊत, मीनाक्षी शिंदे, उमा मेहता, भाग्यश्री विनोदे, शैलजा काळोखे, अरुणा पिंजण, वैशाली टिळेकर तसेच सर्व सेल अध्यक्षा,गाव अध्यक्षा, पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




