पिंपरी चिंचवड: कराड उत्तर विधानसभेतील पुणे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचा एक विशेष स्नेह मेळावा रविवार, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकार मंत्री आणि कराड उत्तर विधानसभेचे आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात स्थानिक नागरिकांना एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळेल, तसेच सामाजिक व विकासात्मक मुद्द्यांवर संवाद साधला जाईल. नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहून आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपूर्ण पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्रातील कराड उत्तर विधानसभेतील नागरिकांना या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. नागरिकांना माजी मंत्री बाळासाहेब पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.




