चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील नेत्यामुळे राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. भाजपने पहिल्या यादीत शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर अजित पवार गटाचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे थेट मुंबईला शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
काटे यांच्या भेटीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेळ दिला आहे, ज्यामुळे चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटातील नाराज नेत्यांनी जोरदार मागणीमुळे महाविकास आघाडी मधील हालचालींना वेग आला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेले मोरेश्वर भोंडवे हेही आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर उमेदवारीसाठी बसले आहेत. त्यांच्या या हालचालींमुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रात राजकीय तापमान वाढले आहे. तसेच ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हेही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत.
एकूणच, सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे मतदारसंघातील दौरे वाढले आहेत, तर सर्वच राजकीय पक्षांकडून कामाचा आढावा घेतला जात आहे. खरं तर २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांमध्ये दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळू शकते. भाजप, अजित पवार गट आणि शिवसेनेतील आतापर्यंतच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.




