पिंपरी : पिंपरी विधानसभेसाठी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना अनेक माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. महायुतीकडून पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे येणार असल्यामुळे, अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, त्यांचे काम न करण्याची शपथ नगरसेवकांनी घेतली.
यावेळी भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे, राजेश पिल्ले, आरपीआय आठवले गटाच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक रोहित काटे, काळूराम पवार, राजू बनसोडे, डब्बू आसवानी, नारायण बहिरवडे, प्रसाद शेट्टी, शेखर घुले, तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी एकत्रित येत शपथ घेतली.
या बैठकीत नगरसेवकांनी एकत्र येऊन अण्णा बनसोडे यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार केला, जो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही असाही निर्धार व्यक्त केला.