चिंचवड :- पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड मतदार संघातील रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दर्शविला होता. फक्त मेळावा घेणार असा निरोप भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवला आणि एखाद्या आमदारांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी तसाच जनसागर उसळला होता. त्याप्रमाणे काल (दि.२४) रोजी बोलावलेल्या संवाद बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला.
यावेळी येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.




