पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्यावतीने भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे उपस्थित होते. पिंपरी विधानसभेत महायुतीकडून अण्णा बनसोडे, महाविकास आघाडीकडून सुलक्षणा शीलवंत तसेच अनेक अपेक्षांनी अर्ज दाखल केलेले आहे.