तळवडे – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांच्या विजयासाठी तळवडे मधील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार केला. यावेळी भीमज्योत मित्र मंडळ तळवडे यांच्या वतीने महेंद्र चव्हाण यांनी अजित गव्हाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
तळवडे प्रभागातील ग्रामस्थांचा उत्साह लक्षणीय होता. प्रचाराच्या दरम्यान अजित गव्हाणे यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, “तळवडे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. तुमच्या दिलेल्या आशीर्वादांचा मी आदर करतो आणि या मतदारसंघात परिवर्तन आणण्यासाठी हा आशीर्वाद मला प्रेरणा देईल.
गव्हाणे यांना विश्वास आहे की, ग्रामस्थांच्या साथीसह भोसरी विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत एक नवा व परिवर्तनशील बदल होईल. तळवडे मधील ग्रामस्थांनी दिलेले आशीर्वाद आणि उत्साहाने मतदारसंघात आगामी परिवर्तनाची नोंद निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तळवडेतील या प्रचार मोहिमेतील उत्साही वातावरणाने अजित गव्हाणे यांच्या विजयाची शक्यता अधिक दृढ केली आहे.




